पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न डॉ राजेंद्र प्रसादजी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. डॉ प्रसाद यांनी भारतीय लोकशाहीचा भक्कम पाया रचण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
एक्स या समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिले,
“देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरयुक्त श्रद्धांजली . घटनासमितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी भारतीय लोकशाहीची भक्कम पायाभरणी करण्यात अमूल्य योगदान दिले. आज संविधानाच्या ७५ व्या वर्धापनदिनाचा उत्सव साजरा करत असताना त्यांचे जीवन व आदर्श अधिकच प्रेरणादायी ठरते आहे.”
देश के प्रथम राष्ट्रपति भारत रत्न डॉ. राजेन्द्र प्रसाद जी को उनकी जन्म-जयंती पर आदरपूर्ण श्रद्धांजलि। संविधान सभा के अध्यक्ष के रूप में भारतीय लोकतंत्र की सशक्त नींव रखने में उन्होंने अमूल्य योगदान दिया। आज जब हम सभी देशवासी संविधान के 75 वर्ष का उत्सव मना रहे हैं, तब उनका जीवन… pic.twitter.com/ZFyYucqFgv
— Narendra Modi (@narendramodi) December 3, 2024