Quoteपंतप्रधानांनी आयुष क्षेत्राचा व्यापक आढावा घेतला, आणि या क्षेत्राच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी धोरणात्मक उपक्रमांच्या गरजेवर दिला भर
Quoteजगभरात आयुषची वाढती स्वीकारार्हता आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या क्षमतेवर पंतप्रधानांनी केली चर्चा
Quoteधोरणात्मक समर्थन, संशोधन आणि नवोन्मेशाद्वारे आयुष क्षेत्राला बळकट करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांनी केला पुनरुच्चार
Quoteपंतप्रधानांनी योग, निसर्गोपचार आणि फार्मसी क्षेत्राबाबत नियमावली आणि सर्वसमावेशक आणि एकात्मिक आरोग्य सेवेला प्रोत्साहन देण्याच्या गरजेवर दिला भर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 7 लोक कल्याण मार्गावर आयुष क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक पार पडली. पारंपारिक ज्ञानाचे जतन करून देशाच्या आरोग्य परिसंस्थेसाठी योगदान देण्यासह, सर्वांगीण कल्याण आणि आरोग्यसेवेतील आयुष क्षेत्राची महत्वाची भूमिका यावेळी अधोरेखित करण्यात आली.

2014 मध्ये आयुष मंत्रालयाची स्थापना झाल्यापासून, त्याची अफाट क्षमता लक्षात घेऊन, पंतप्रधानांनी या क्षेत्राच्या विकासाकरता स्पष्ट पथदर्शक आराखडा तयार केला आहे. या क्षेत्राच्या प्रगतीचा सर्वंकष आढावा घेताना, पंतप्रधानांनी या क्षेत्राच्या पूर्ण क्षमतेचा वापर करण्यासाठी धोरणात्मक हस्तक्षेपाच्या गरजेवर भर दिला.यामध्ये उपक्रमांचे सुसूत्रीकरण करणे, साधन संपत्तीचा अधिकाधिक वापर करणे आणि आयुषची जागतिक उपस्थिती वाढवण्यासाठी दूरदर्शी मार्ग आखणे, यावर भर देण्यात आला.

या आढावा बैठकीत पंतप्रधानांनी या क्षेत्राच्या महत्वाच्या योगदानावर भर दिला. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेला चालना देण्यामधील त्याची भूमिका, औषधी वनस्पतीच्या लागवडीद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे, आणि पारंपरिक औषधांमध्ये अग्रेसर म्हणून भारताचे जागतिक स्थान बळकट करणे, याचा यात समावेश होता.या क्षेत्राची जगभरातील वाढती स्वीकृती आणि शाश्वत विकास आणि रोजगार निर्मितीला चालना देण्याची क्षमता लक्षात घेता, त्यांनी या क्षेत्राची लवचिकता आणि विकासावर प्रकाश टाकला.

धोरणात्मक समर्थन, संशोधन आणि नवोन्मेशाच्या माध्यमातून आयुष क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. योग, निसर्गोपचार आणि फार्मसी क्षेत्राबाबत नियमावली आणि सर्वसमावेशक आणि एकात्मिक आरोग्य सेवेला प्रोत्साहन देण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. प्रशासनाच्या विविध क्षेत्रांच्या कामकाजात पारदर्शकता हा पाया असायला हवा, यावर पंतप्रधानांनी भर दिला. सर्व भागधारकांनी आपले काम केवळ  कायद्याचे राज्य आणि सार्वजनिक हितासाठी राहील, हे सुनिश्चित करावे, आणि सचोटीचे सर्वोच्च मानदंड अंगीकारावेत, अशी सूचना त्यांनी केली.

शिक्षण, संशोधन, सार्वजनिक आरोग्य, आंतरराष्ट्रीय सहकार्य, व्यापार, डिजिटलायझेशन आणि जागतिक विस्तारात महत्वाचे टप्पे गाठत, आयुष क्षेत्र वेगाने भारताच्या आरोग्य सेवा परिप्रेक्ष्यात एक प्रेरक शक्ती म्हणून विकसित झाले आहे. सरकारच्या प्रयत्नांतून या क्षेत्राने यशाचे अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले असून, त्याविषयी पंतप्रधानांना या बैठकीत माहिती देण्यात आली.

  • आयुष क्षेत्राने अत्युत्कृष्ट आर्थिक वृद्धीचे प्रदर्शन केले असून वर्ष 2014 मध्ये 2.85 अब्ज डॉलर्स मूल्याचे उत्पादन झाले होते त्यात उत्तम वाढ होऊन वर्ष 2023 मध्ये ते 23 अब्ज डॉलर्स इतके झाले आहे.
  • आयुष संशोधन पोर्टलवरील 43,000 हून अधिक अभ्यासांसह भारताने पुरावा आधारित पारंपरिक उपचार क्षेत्रात स्वतःला जागतिक नेता म्हणून प्रस्थापित केले आहे.
  • गेल्या 10 वर्षांत या क्षेत्रातील संशोधनविषयक प्रकाशने त्याआधीच्या 60 वर्षांतील प्रकाशनांहून अधिक आहेत.
  • वैद्यकीय पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी आयुष व्हिसाची सुविधा देऊन समग्र आरोग्यसेवा विषयक सुविधांकडे आंतरराष्ट्रीय रुग्णांना आकर्षित करण्याचे प्रयत्न.
  • राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रमुख संस्थांशी सहयोगाच्या माध्यमातून आयुष क्षेत्राने लक्षणीय झेप घेतली आहे.
  • या क्षेत्रातील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण आणि आयुष ग्रीड अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या समावेशावर पुन्हा नव्याने लक्ष केंद्रित.
  • योगाला प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानांचा वापर करणार.
  • वाय-ब्रेक योगा सारख्या अधिक समावेशक उपक्रमाच्या आयोजनासाठी आयजीओटी मंच
  • गुजरातमध्ये जामनगर येथे जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक पारंपरिक वैद्यकीय केंद्राची स्थापना ही महत्त्वाची यशस्वी कामगिरी पारंपरिक औषधोपचार क्षेत्रात  भारताच्या नेतृत्वाचे समर्थन करते.
  • जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय आजार वर्गीकरण (आयसीडी)-11 मध्ये पारंपरिक औषधांचा समावेश
  • या क्षेत्राच्या पायाभूत सुविधा आणि पोहोच यांचा विस्तार करण्यात राष्ट्रीय आयुष अभियान महत्त्वाचे ठरले.
  • वर्ष 2024 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात 24.52 कोटींहून अधिक लोकांनी भाग घेतला असून आता हा आंतरराष्ट्रीय उपक्रम झाला आहे.
  • यावर्षी आंतरराष्ट्रीय योग दिन उपक्रमाचे 10 वे वर्ष असून या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर संपूर्ण जगभरातून अधिकाधिक लोक यात सहभागी होतील.

केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव डॉ. पी.के.मिश्रा, पंतप्रधानांचे द्वितीय प्रधान सचिव शक्तीकांत दास, पंतप्रधानांचे सल्लागार अमित खरे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
1 in 3 US smartphone imports now made in India, China’s lead shrinks

Media Coverage

1 in 3 US smartphone imports now made in India, China’s lead shrinks
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 26 जुलै 2025
July 26, 2025

Citizens Appreciate PM Modi’s Vision of Transforming India & Strengthening Global Ties