Quoteकोरोना महामारीच्या काळातही भगवान बुद्धांची शिकवण कालसुसंगत - पंतप्रधान
Quoteबुद्धांनी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब करत खडतर आव्हानांचा सामना कसा करावा हे भारताने दाखवून दिले : पंतप्रधान
Quoteजगाला संकटकाळात बुद्धांच्या शिकवणीची ताकद उमजली : पंतप्रधान
Quoteआषाढ पौर्णिमा - धम्मचक्र दिन कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधानांचा संदेश.

कोरोना महामारीच्या सध्याच्या काळात भगवान बुद्ध अधिक कालसुसंगत असल्याचे पंतप्रधान श्री नरेन्द्र मोदी यांनी म्हटले आहे. 

बुद्धांनी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब करत आम्ही आणखी खडतर आव्हानांचा सामना करु शकतो हे भारताने दाखवून दिले आहे.  बुद्धांच्या शिकवणीचा मार्ग अनुसरत संपूर्ण जग एकसंध होत मार्गक्रमण करत आहे.

'प्रार्थनेसह काळजी' हा आतंरराष्ट्रीय बौध्द महासंघाचा उपक्रम प्रशंसनीय असल्याचे त्यांनी आषाढ पौर्णिमा - धम्मचक्र दिन कार्यक्रमाप्रसंगी आपल्या संदेशात सांगितले. 

|

आपली बुद्धी, वाणी, कृती आणि प्रयत्न यातील सौहार्द आपल्याला वेदनेपासून दूर नेतील अर्थात आनंदाच्या दिशेने पुढे जाऊ असे पंतप्रधान म्हणाले.

चांगल्या काळात सर्वांच्या कल्याणासाठी काम करण्याकरता तर कठिण प्रसंगी परस्परांना बळ देण्याची प्रेरणा यामुळे मिळते. भगवान बुद्धांनी या सौहार्दासाठी आपल्याला अष्टमार्ग दिल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

|

त्याग आणि  संयमाच्या अग्नीतून तावूनसुलाखून निघालेले बुद्ध जेव्हा बोलू लागतात तेव्हा ते केवळ शब्द उरत नाहीत, तर ते संपूर्ण धम्मचक्र प्रवर्तन होते. त्यांनी दिलेले ज्ञान जगाच्या कल्याणासाठीचा समानार्थी अर्थ ठरतो. यामुळेच आज संपूर्ण जगभरातील लोक त्यांचे अनुयायी होत आहेत असे पंतप्रधान म्हणाले.

धम्मपदाचा दाखला देत ,” वैराने वैर संपत नाही. वैर केवळ शांत मन आणि प्रेमानेच शांत होते” असे ते म्हणाले . जगाला संकटकाळात बुद्धांच्या शिकवणीची ताकद उमजली आहे. बुद्धांची ही शिकवण, मानवतेचा हा  अनुभव जसजसा समृद्ध होईल हे जग समृद्धीची, यशाची नवनवी शिखरे सर करेल या शब्दात पंतप्रधानांनी आपल्या संदेशाची सांगता केली.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Raj Kapoor’s Iconic Lantern Donated To PM Museum In Tribute To Cinematic Icon

Media Coverage

Raj Kapoor’s Iconic Lantern Donated To PM Museum In Tribute To Cinematic Icon
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM Modi greets everyone on occasion of National Science Day
February 28, 2025

The Prime Minister Shri Narendra Modi greeted everyone today on the occasion of National Science Day. He wrote in a post on X:

“Greetings on National Science Day to those passionate about science, particularly our young innovators. Let’s keep popularising science and innovation and leveraging science to build a Viksit Bharat.

During this month’s #MannKiBaat, had talked about ‘One Day as a Scientist’…where the youth take part in some or the other scientific activity.”