पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून जपानचे पंतप्रधान महामहीम एच.ई. किशिदा फुमियो यांनी 14 व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी 19-20 मार्च 2022 दरम्यान नवी दिल्लीला अधिकृत भेट दिली. ही शिखर परिषद दोन्ही नेत्यांची पहिली भेट होती. यापूर्वीची भारत-जपान वार्षिक शिखर परिषद ऑक्टोबर 2018 मध्ये टोकियो येथे झाली होती.
भारत आणि जपान यांच्यात त्यांच्या ‘विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी’यांच्या परीप्रेक्षात बहुआयामी सहकार्य आहे. भारत-पॅसिफिक प्रदेशात शांतता, स्थिरता आणि समृद्धी यासाठी दोन्ही बाजूंना विविध क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्याचे पुनरावलोकन आणि बळकटीकरण तसेच परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करण्याची संधी या शिखर परिषदेने उपलब्ध केली.