स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवेकानंद यांना आदरांजली वाहिली आहे. स्वामी विवेकानंद यांच्याविषयी, त्यांच्या विचारांचा एक व्हिडिओही पंतप्रधानांनी सामायिक केला आहे.
पंतप्रधानांनी एक्स संदेशात लिहिले आहे ;
"भारतीय अध्यात्म आणि संस्कृतीची ध्वजा विश्वपटलावर रोवणाऱ्या स्वामी विवेकानंदांना त्यांची जयंती, राष्ट्रीय युवा दिनानिमित्त अभिवादन. ऊर्जा आणि स्फुर्तीने परिपूर्ण असलेले त्यांचे विचार आणि संदेश, युवकांना सर्वोत्तम कार्यासाठी युगानुयुगे प्रेरणा देत राहतील".
भारतीय अध्यात्म और संस्कृति को वैश्विक पटल पर स्थापित करने वाले स्वामी विवेकानंद को उनकी जन्म-जयंती, राष्ट्रीय युवा दिवस के अवसर पर शत-शत नमन। ऊर्जा और स्फूर्ति से परिपूर्ण उनके विचार और संदेश युग-युगांतर तक युवाओं को कुछ कर गुजरने के लिए प्रेरित करते रहेंगे। pic.twitter.com/4TfuLBiKLn
— Narendra Modi (@narendramodi) January 12, 2024