सोमनाथ विश्वस्त मंडळाची 116 वी बैठक आज सोमनाथमध्ये झाली.
या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, अमित शहा, केशुभाई पटेल, पी.के.लाहेरी, जे.डी. परमार आणि हर्ष नेओटिया उपस्थित होते.
श्री सोमनाथ मंदिराचा संपूर्ण परिसर पाणी, हिरवळ आणि इतर सुविधांनी अद्ययावत करण्यात यावा, असे मोदी यांनी या बैठकीत सुचवले. वेरावळ आणि प्रभास पाटण रोखमुक्त व्हावेत यासाठी विश्वस्त मंडळाने सक्रिय सहभाग घ्यावा, अशी शिफारस त्यांनी केली. महत्त्वाच्या सर्व शहरांमध्ये विश्वस्त मंडळाने विशेष महोत्सवांचे आयोजन करावे, असेही त्यांनी सुचवले.
वर्ष 2017 साठी केशुभाई पटेल हेच मंडळाच्या प्रमुखपदी राहतील, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.