आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. वारकरी परंपरा आणि पंढरपुरातले भक्तिमय वातावरण याचे महत्त्व यापूर्वीच्या मन की बात मध्ये पंतप्रधानांनी सांगितले होते. या भागातील हा अंश देखील पंतप्रधानांनी सामाईक केला आहे.  

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहे;

" आषाढी एकादशीच्या या पवित्र प्रसंगी सर्वांना शुभेच्छा. भगवान श्रीविठ्ठलाचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहोत  आणि आपल्या समाजात आनंदाची भावना वृद्धिंगत होऊ दे. वारकरी परंपरा आणि पंढरपुरातील भक्तिमय वातावरण याविषयी यापूर्वीच्या #MannKiBaat मध्ये मी सांगितले होते तो अंश मी सामाईक करत आहे."

 

काही आठवड्यांपूर्वी देहू येथे संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे उद्घाटन करताना केलेल्या भाषणाचा व्हिडिओ देखील पंतप्रधानांनी सामाईक केला आहे.

त्यांनी ट्वीट केले आहे:

" काही आठवड्यांपूर्वी मी संत तुकाराम महाराजांच्या मंदिराचे उद्घाटन करण्यासाठी देहू येथे गेलो होतो. माझ्या भाषणात महान वारकरी संत आणि महात्म्यांचे उदात्त विचार मी अधोरेखित केले होते आणि आपल्या सर्वांना त्यामधून काय शिकता येईल त्याविषयी बोललो होतो."

त्याशिवाय पंतप्रधानांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये वारकरी परंपरेविषयी केलेले भाषण देखील सामाईक केले आहे.

पंतप्रधानांनी ट्वीट केले आहेः

" पंढरपूरमध्ये धार्मिक पर्यटनाला चालना देणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमीपूजन करण्याचा बहुमान गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात मला प्राप्त झाला होता. भारताच्या युवा वर्गामध्ये वारकरी परंपरा आणखी लोकप्रिय करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
India’s Biz Activity Surges To 3-month High In Nov: Report

Media Coverage

India’s Biz Activity Surges To 3-month High In Nov: Report
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 नोव्हेंबर 2024
November 24, 2024

‘Mann Ki Baat’ – PM Modi Connects with the Nation

Driving Growth: PM Modi's Policies Foster Economic Prosperity