फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ले यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
यावेळी पार्ले यांनी पंतप्रधान मोदी यांना द्विपक्षीय संरक्षण सहकार्याबद्दल माहिती दिली. संरक्षण सहकार्य हा भारत आणि फ्रान्समधल्या सामरीक भागीदारीचा एक मुख्य आधारस्तंभ असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं. संरक्षण निर्मिती आणि संयुक्त संशोधन तसेच विकासात ‘मेक इन इंडिया’ चौकटीअंतर्गत फ्रान्सने अधिक सहकार्य करावे असे पंतप्रधानांनी सांगितले.
यावेळी दोन्ही नेत्यांदरम्यान प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर चर्चाही झाली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅकरॉन यांचे भारतात लवकरात लवकर स्वागत करण्यासाठी उत्सुक असल्याचेही पंतप्रधानांनी सांगितलं.